Latest Marathi News
Ganesh J GIF

प्रेम आणि करिअरवर पहिल्यांदाच बोलली महाराष्ट्राची क्रश

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतानाही सांगितला दुहेरी योग, फोटोंनी वेधले चाहत्यांचे लक्ष

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाची आज सुरुवात होत आहे. मोठ्या उत्साहाने जल्लोषात घरोघरी गुढ्या उभारून नवीन वर्षाची स्वागत करण्यात आले. मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या प्राजक्ता माळीने सर्वाना शुभेच्छा देताना आजच्या दिवसाचे महत्व सांगत एका दुर्मिळ योगाची आठवण करून दिली आहे.

प्राजक्ताने दुहेरी योगाबद्दल म्हणाली की, प्राजक्ताने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना लिहिलं आहे,”आज चैत्र शुद्ध प्रतिपदा; आजपासून शालिवाहन शके १९४५ शोभन संवत्सरास प्रारंभ होत आहे. तुम्हा सर्वांना मराठी- हिंदू किंबहुना ‘भारतीय’ नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. यंदाचे वर्षी आपलं नव वर्ष आणि भारतीय राष्ट्रीय सौर वर्ष एकाच दिवशी अर्थात आजपासून सुरू होतय. कित्येक वर्षांनी असा योग येतो. त्यामुळे सर्वांना दुहेरी शुभेच्छा. हे झालं संस्कृतीविषयी, तेवढाच रस आपल्याला खाद्य संस्कृतीतही आहे.
तर यंदाचं नवं वर्ष shooting set वर असताना देखील; श्रीखंड- पुरी, बटाटा भाजी, पापड यावर ताव मारून साजरं करण्यात आलय. (पुऱ्या गरम होत्या, फोटो काढण्यात वेळ नाही घालवला.Set च्या मालकांनी जेवण पाठवलं.#luckyme ) माझ्या आयूष्यात “राम” आहे, तुमच्याही आयूष्यात तो भरून राहो.” अशी पोस्ट तिने लिहिली आहे.याला तिने विचारांची गुढी असा हॅशटॅग देखील दिला आहे. या पोस्टसोबत प्राजक्ताने तिचे गुलाबी साडीतील अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्राजक्ताने मध्यंतरी दिलेल्या मुलाखतीत प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. प्रेमाने मोठ्यातला मोठा डोंगरही हलवता येतो. असे असले तरी आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते मला फार उथळ वाटतं. पैशांसाठी तडजोड केलेलं हे प्रेम वाटतं. कधी भविष्याचा विचार करून, कधी रडायला खांदा पाहिजे, असे म्हणत परखड मत व्यक्त केले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!