
आत्महत्या करण्यापुर्वी या अभिनेत्रीवर झाला होता बलात्कार?
अभिनेत्रीच्या हत्येप्रकरणी मोठा दावा, न्यायालयाचे महत्वाचे निर्देश, या प्रकरणी नवा ट्विस्ट, नेमका आरोप काय?
मुंबई दि ९(प्रतिनिधी)- भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेचा काही महिन्यापुर्वी संशयास्पद मृत्यू झाला होता. आता आकांक्षाच्या मृत्यूला सहा महिने उलटले आहेत. पण तिच्या कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळाला नाही. पण आता या प्रकरणात वेगळाच ट्विस्ट समोर आला आहे. आकांक्षाच्या आईने आता सीबीआय चौकशीची मागणी करत मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
अभिनेत्री आकांक्षा दुबे शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. त्यावेळी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेत आपलं आयुष्य संपवले होते. त्यावेळी पोलीसांनी पंजाबी गायक समर सिंहला संशयीत म्हणून ताब्यात घेतले होते. आता या संशयास्पद मृत्यूप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत दाखल करण्यात आला आहे. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे. आकांक्षा दुबेच्या आईने दाखल केलेल्या याचिकेनुसार, आकांक्षाचा मृत्यू संशयास्पद आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही हे निर्देश करतो. काही महत्त्वाचे पुरावे दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा-समर यांची भेट ३ वर्षांपूर्वी झाली होती. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आता या प्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीवर न्यायालयाने विरोधी पक्ष आणि यूपी सरकारकडून उत्तरे मागितली आहेत. उत्तर देण्यासाठी कोर्टाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. आता या याचिकेवर ५ आठवड्यांनंतर सुनावणी होणार आहे. आकांक्षा दुबे हीने २६ मार्च २०२३ रोजी आत्महत्या करून आपलं आयुष्य संपवल होते. या घटनेनंतर भोजपूर चित्रपटसुष्टीत मोठी खळबळ उडाली होती.
टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे १.७ मिलियन फॉलोअर्स होते. वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली होती.