Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! सुनेची सासूला या कारणामुळे बेदम मारहाण

मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, पोलीसांचे कारवाईचे आश्वासन, नेटकरी संतप्त

ठाणे दि ९(प्रतिनिधी)- घराघरात सासु सुनांचे वाद वाद अधूनमधून होत असतात. पण कधी कधी हे वाद गंभीर पातळीवर जातात. असाच एक प्रकार ठाणे शहरातून समोर आला आहे. यात एका सुनेने सासूला बेदम मारहाण केली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

ठाणेच्या कोपरीतील सिद्धार्थनगर परिसरातील एका घरात महिलेने आपल्या सासूला मारहाण केली आहे. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, सासू हॉलमधील सोफ्यावर बसली असताना सून तिला घरातून निघून जा म्हणून वारंवार म्हणत आहे. प्रत्युत्तरदाखल वृद्ध महिलाही सूनेला शिवीगाळ करताना दिसत आहे. त्यामुळे सुनेचा राग अनावर होतो आणि ती सासूला जमीनीवर खेचते, यावेळी सुनेने सासूला मारहाण देखील केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे अमानुष कृत्य सुरु असताना त्या घरात या दोन महिलांशिवाय अजून एक महिला किचनमध्ये काम करताना दिसत आहे. पण ती या वादात कोणताही हस्तक्षेप करत नाही. ती महिला कामवाली असावा असा अंदाज आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून १४ सप्टेंबर रोजी घडली आहे. पण आता ठाण्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने हे सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता ठाणे पोलिसांनीही या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

नवरा बायकोमध्ये राहत्या घरावरून वाद सुरु आहेत. त्यामुळे त्या रागातून सुनेने सासूला मारहाण केली. मारहाण झालेल्या साडीचे वय ७० वर्ष आहे. या घटनेचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते Binu Varghese यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील x वरील अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!