Latest Marathi News
Ganesh J GIF

रितेश बायको जेनेलियाबद्दल हे काय बोलून गेला…

सोशल मिडीयावर व्हिडिओ व्हायरल, रितेश जीव वाचवण्यासाठी...

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बॉलिवूडचे सुंदर कपल म्हणजे रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूजा. दोघंही सोशल मिडीयावर कायम सक्रिय असतात. पण त्यातही त्यांनी आपली संस्कृती जोपासल्याचे आपल्या मुलांना दिलेल्या संस्कारावरुन दिसून येते. जेनेलीया आणि रितेश रिल्समुळे देखील चर्चेत असतात. नुकताच रितेशने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने जेनेलियाबद्दल वेगळीच उपमा दिली.हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रितेश देशमुखनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेश बोलतो की, “हेल्मेट आणि पत्नी दोनोका स्वभाव सेम है, दोनोको सिर पर चढ़ा कर रखो आपकी जान बची रहेगी!” रितेशचा हा व्हिडी प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्या दोघांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. दोघांची जोडी सोशल मीडियावरील लोकप्रिय आहे. रितेश बाॅलीवूडमध्ये असला तरी जेनेलिया चित्रपट सृष्टीपासून दुर आहे. पण मूल मोठी झाल्यानंतर जेनेलिया सु्द्धा लवकरच एका चित्रपटात झळकणार आहे.जेनेलिया तब्बल दहा वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

रितेश आणि जेनेलिया ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात एकत्र दिसले होते आता ही मराठमोळी जोडी लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटाद्वारे जेनेलिया मराठी इंडस्ट्रीज पदार्पण करणार आहे. जेनेलियाने आपल्या ट्विटर हँडलवर ‘वेड’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या चित्रपटात सलमान खान देखील महत्त्वाची भूमिका पार पडणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!