Latest Marathi News
Ganesh J GIF

डॉक्टर नगरसेविका धावून आली नसती तर? शिरूरमधील ‘त्या’ घटनेने आरोग्य विभागाचे पितळ उघडे पाडले.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहरात आज माणुसकीचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. प्रसूती कळा सुरू असताना पायी रुग्णालयाकडे जाणाऱ्या एका गरीब महिलेची भररस्त्यातच प्रसूती झाली.यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि डॉक्टर असलेल्या महिला नगरसेविका मदतीला धावून आल्याने एका नवजात बालकाला आणि मातेला जीवदान मिळालं आहे.

शिरूरमधील जोशीवाडी परिसरात राहणारी एक गरोदर महिला आज प्रसूती कळा आणि पोटात असह्य वेदना होत असल्याने शिरूर ग्रामीण रुग्णालयाकडे पायी जात होती. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शिरूर शहरातील निर्माण प्लाझा परिसरात तिला तीव्र कळा सुरू झाल्या आणि ती तिथेच रस्त्यावर बसली. पुढच्या काही क्षणात महिलेने रस्त्यातच बाळाला जन्म दिला.साड्यांचा पडदा आणि नागरिकांची रस्त्यावर महिलेची प्रसूती होत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी वेळ न दवडता मदतीसाठी धाव घेतली. शेजारील पडवळ कुटुंबाकडून तातडीने साड्या मागवण्यात आल्या, तर काहींनी स्वतःचे स्कार्फ देऊन महिलेभोवती आडोसा तयार केला. एका स्थानिक पत्रकाराने या घटनेची माहिती वैद्यकीय व्यावसायिक आणि शिरूरच्या नगरसेविका डॉ. सुनिता पोटे यांना दिली.
डॉक्टर नगरसेविका देवदूत बनून आल्या

माहिती मिळताच डॉ. सुनिता पोटे आणि नगरसेविका पूजा पोटावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठले. परिसरातील मेडिकल स्टोअर चालकांनी आवश्यक वैद्यकीय साहित्य वेळेत उपलब्ध करून दिले. जन्मानंतर बाळ रडत नव्हते आणि त्याला श्वास घेण्यास अडथळा येत होता. अशा गंभीर परिस्थितीत डॉ. सुनिता पोटे यांनी त्यांच्या वैद्यकीय तंत्राचा वापर करून बाळाला रडते केले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच परिसरात उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले.बाळ आणि माता सुरक्षित डॉ. पोटे यांनी बाळाची नाळ कापून प्राथमिक सोपस्कार पार पाडले. त्यानंतर आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी डॉ. पोटे यांच्या नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले. सध्या बाळ आणि माता दोघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे डॉ. सुनिता पोटे यांनी सांगितले.भररस्त्यात उद्भवलेल्या या आणीबाणीच्या प्रसंगात शिरूरच्या नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!