Latest Marathi News
Ganesh J GIF

मनोहर मामा भोसले अटकेत!

राज्यात भोंदूबाबांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली असून, स्वतःला ‘बाळू मामाचा अवतार’ म्हणवणाऱ्या मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई आर्थिक फसवणूक आणि भोंदुगिरीच्या आरोपांखाली कुर्डूवाडी पोलिसांनी केली असून, याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली.

मनोहर भोसले याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. करमाळा आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्यांत महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल असून, बारामती आणि दौंड येथे भोंदुगिरी तसेच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.याशिवाय कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोसले याच्यावर कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्याचे खोटे आश्वासन देत लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणांमुळे अनेक नागरिकांची दिशाभूल झाल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी अत्याचाराच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र जामिनावर असतानाच पुन्हा गुन्हा केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, भोंदुगिरी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींविरोधात सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!