संजय राऊतांमुळे चर्चेत आलेला हक्कभंग प्रस्ताव काय असतो?
हक्कभंग सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा होते, ही समिती करणार राऊतांचा फैसला
मुंबई दि १(प्रतिनिधी) – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलच राजकारण तापले आहे. महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्याची मागणी करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर हक्कभंग म्हणजे काय? आणि हक्कभंग सिद्ध झाल्यास काय शिक्षा होऊ शकते? याचा घेतलेला आढावा.
खासदार आणि आमदारांना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. या अधिकारांच्या विरोधात कोणत्याही व्यक्तीला किंवा समुदायाला वक्तव्य किंवा वर्तन करता येत नाही. तसेच विधानभवनाच्या बाहेर देखील असभ्य वर्तन करता येत नाही. पण जर कोणी तसे वर्तन केले तर तो हक्कभंग ठरतो. जर शिक्षा करायची झाल्यास अवमान करणारा व्यक्ती स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते. तसेच दुसरा व्यक्ती असेल तर तुरुंगवासापर्यंत शिक्षा होऊ शकते किंवा समज देऊन सोडून दिले जाऊ शकते. विधानसभेचा अवमान किंवा हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला शिक्षा करण्याचा अधिकार हा सभागृहाला असतो. हक्कभंग खरच झाला आहे का? याच्या चाैकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात येते ती समिती कोणत्या कराणासाठी हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. याची चाैकशी करते. तसेच ही समिती हक्कभंगास कारणीभूत व्यक्तीला समन्स पाठवून विधानसभेत बोलावून घेऊ शकते. असे विशेष अधिकार त्या समितीला असतात.
संजय राऊतांवरील हक्कभंग चाैकशीसाठी राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कुल यांच्यासह अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे.