
‘टीआरपीसाठी तुम्ही काहीही करता त्यांची फळे मी भोगलीत’
इंदुरीकर महाराज पुन्हा का संतापले? अखेर धनजंय मुंडेनी शांत केले
बीड दि १० (प्रतिनिधी)- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.इंदुरीकर आणि कॅमेरावाले यांच्यात फारसे सख्य दिसून येत नाही. त्याचाच प्रत्यय बीड मध्ये दिसून आला आहे. पण धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केल्याने अखेर या वादावर पडदा टाकण्यात आला.
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात नाथ प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवाचा समारोप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. त्यावेळी इंदुरीकर महाराज आणि कॅमेरेवाले यांच्यात वाद झाला. याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. आपले किर्तन लाइव्ह करु नये असा त्यांचा आग्रह असतो. कारण टीआरपी साठी आपले व्हिडिओ एडीट करुन दाखवल्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागल्याचे त्यांचे म्हणणे आहे या व्हिडिओतही ते किर्तनात अभंग सादर करताना कॅमेऱ्यामनला खाली उतरण्याचा इशारा केला. कॅमेरे बंद व्हावेत, म्हणून त्यांनी थेट कॅमेरा ऑपरेट करणाऱ्याला दमही दिला. अखेर इंदुरीकर महाराजांना शांत करण्यासाठी आणि कॅमेरे सुरु राहावेत, यासाठी धनंजय मुंडे यांना मध्ये पडावं लागलं. त्यानंतर अखेर हा वाद मिटला. आणि कीर्तन सुरु झाले.
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून जे काही सांगतात ते पूर्णत: चुकीचे नसते. परंतु, नेहमी टोकाची भूमिका घेतल्याने त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कीर्तनातलं मधलं कुठलंतरी एक वाक्य उचलायचं आणि त्यानंतर कीर्तनातलं दुसरं कुठलंतरी वाक्य कापायचं, ते एकमेकाशी जोडून फेसबुक, युट्युबवर अपलोड करायचं, याचे परिणाम आम्हाला भोगायला लागतात’ असा संताप त्यांनी व्यक्त केला होता.