
काय नाही, त्या सनीला नका गुंतवू आता संशयितमध्ये…
वाल्मिक कराड आणि पीआय शीतल बल्लाळ यांचा फोन काॅल व्हायरल, कराडचा पोलीसांवरही दबाव?
बीड – सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड याच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. प्रशासनात वाल्मिक कराड याचा किती दबदबा होता, हे याआधीही अनेकवेळा दिसून आलेले आहे. पण आता अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
बीड येथील पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्यातील एका फोन कॉलवरील रेकॉर्ड अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करत खळबळ उडवून दिली आहे. सनी आठवले आपला पोरगा आहे, त्याला संशयित म्हणून अडकवू नका, अशी विनंती करणारा फोन वाल्मिक कराड याने बीडमधील पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना केल्याचा दावा करण्यात आला आहे. सानी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्या संबंधी वाल्मिक कराड आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्यात थेट संवाद झाल्याने पोलीस दलात एकाच खळबळ उडाली आहे. दरम्यान व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमधवा आवाज अगदी माझ्यासारखाच आहे पण संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे. एआय वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवली गेल्याचा दावा पोलीस निरीक्षक बल्लाळ यांनी केला आहे.
सनी आठवले नावाच्या युवकाने सोशल मीडियात पोस्ट करून ऑडिओ क्लीप टाकली आहे. त्यात तो म्हणतो की, शीतल बल्लाळ हे वाल्मीक कराडचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्या दीपज्योत माध्यमातून जोडलो होतो. मात्र काही कारणास्तव मी दूर गेलो आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत आढळून आलो. त्याचा राग वाल्मीक कराडला होता. असा दावा सनी आठवले याने केला आहे.