Just another WordPress site

जेंव्हा अक्षय कुमार पुण्यातील मिसळ पाववर ताव मारतो

मिसळ पाव खातानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

पुणे दि ५ (प्रतिनिधी)- बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लाखो भारतीयांचा आवडता अभिनेता आहे.आपल्या दमदार अभिनया जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. तो सोशल मीडियावरही कायमच चर्चेत असतो.पण हा खिलाडी सध्या पुणे दाै-यावर असून त्याने पुण्याची ओळख असणाऱ्या मिसळ पाववर ताव मारला आहे.

अक्षय कुमारचा या राखी पोर्णिमेला ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्या चित्रपटाच्या प्रमोधनसाठी तो पुण्यात आला होता. यावेळी त्याने आपल्या टीमसोबत मिसळ पावचा आस्वाद घेतला. पुण्यातील ‘श्रीमंत मिसळ आणि बरंच काही’ येथे रक्षाबंधनच्या पूर्ण टीमने मिसळ पाववर आडवा हात मारला. त्यांचा मिसळ पाव खातानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आपल्या तब्येतीबाबत जागरुक असणार अक्षय झणझणीत मिसळ पाववर ताव मारत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या व्हिडिओवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.

GIF Advt

‘रक्षाबंधन’ चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आनंद एल राय यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट बहिणीसाठी असल्याचं अक्षयने म्हटलं होतं. ‘सम्राट पृथ्वीराज’ फ्लॉप ठरल्यानंतर या चित्रपटाकडून अक्षयप्रमाणेच त्याच्या चाहत्यांनाही अपेक्षा आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!