Just another WordPress site

तुमच तुमच्या मुलावर लक्ष आहे का?

अमरावतीत 'या' घटनेने पालक वर्गात चिंता

अमरावती दि ६(प्रतिनिधी)- अमरावतीत एका फास्ट फूड सेंटरमध्ये युवक आणि युवतींचे अश्लील चाळे सुरु होते. याची परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. अखेर पोलीसांनी या ठिकाणी धाड टाकल्यानंतर काही तरुण-तरुणी अश्लील चाळे करताना दिसून आले. पोलिसांनी सर्व तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे यात बहुसंख्य तरूण तरूणी शिक्षणासाठी अमरावतीत आलेले आहेत.

अमरावतीमधील गाडगे नगर परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये हा प्रकार सुरु होता. या मॉलमध्ये द ब्रँड टेस्ट नावाचे फास्ट फूड सेंटर आहे. तिथेच हा सगळा गैरप्रकार सुरु होता. फास्ट फूड सेंटरच्या नावावर तरुण युवक-युवतींना ज्यादा पैसे घेऊन चाळे करण्यासाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जात होती. पोलिसांना या घटनेची कुणकुण लागल्यानंतर पोलीस आयुक्तालयाचे पथक आणि गाडगे नगर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी सिटी सेंटर मॉलवर छापा टाकत कारवाई केली. यावेळी पोलिसांनी ४ मुले आणि ५ मुलींना ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरु आहे. पोलीसांनी जोडप्यांवर आणि हॉटेल चालकावर कारवाई केली आहे.

GIF Advt

आपली मुलं शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीला लागावीत, यासाठी त्यांना शिक्षणासाठी शहरात पाठवतात. पण काहीजण पालकांनी दिलेल्या संधीचा गैरफायदा घेऊन विश्वासघात करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!