Latest Marathi News
Ganesh J GIF

या राज्यात भाजपा की काँग्रेस कोणता पक्ष येणार सत्तेत?

ओपिनियन पोलची धक्कादायक आकडेवारी समोर, सर्वेक्षणात कोण आघाडीवर? कोणाला किती जागा? पहा आकडेवारी

भोपाळ दि ५(प्रतिनिधी)- देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. देशातील महत्वाच्या पाच राज्यात सध्या निवडणूक सुरु आहे. विधानसभेसाठी ही निवडणुक पार पडत आहे. त्यात मध्यप्रदेश हे राज्य पक्षांसाठी अतिशय महत्वाचे आहे. कारण या निवडणूक जो पक्ष बाजी मारेल त्या पक्षाला लोकसभा निवडणूकीसाठी फायदा होणार आहे. पण याच दरम्यान मध्यप्रदेशमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार याचा ओपिनियन पोल समोर आला आहे.

मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणूकीबाबत नुकताच इंडिया टीव्ही- सीएनएक्सचा ओपिनियन पोल समोर आला आहे. मध्य प्रदेशातील एकूण २३० जागांपैकी भाजप ११९ जागा जिंकण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस पक्षाला १०७ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ४ जागांवर इतर पक्ष किंवा अपक्ष विजयी होऊ शकतात. मतांच्या टक्केवारीत भाजपा बाजी मारताना दिसत आहे. भाजपला ४६.३३ टक्के, तर काँग्रेसला ४३.२४ टक्के मते मिळू शकतात. त्याचबरोबर एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्व्हेनुसार भाजपला ९९ ते १११ जागा मिळू शकतात, तर काँग्रेस ११८ते १३० जागा जिंकण्याची शक्यता आहे. ‘पोलस्टर्स इंडिया’ नावाच्या एजन्सीने राज्यात एक ओपिनियन पोल घेतला आहे. या पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला १२४ जागांसह पूर्ण बहुमत मिळू शकते, तर काँग्रेसला केवळ ९७ जागांवर समाधान मानावे लागू शकते. दरम्यान २०१८ च्या निवडणुकीत भाजपने १०९ जागा जिंकल्या होत्या. तर ४१.०२ टक्के मते मिळवली होती. दुसरीकडे काँग्रेसने मागील निवडणूकीत ११४ जागा जिंकल्या होत्या. तर ४०.८९ टक्के मते मिळवली होती. त्यावेळी काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. मात्र मार्च २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप-काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सत्तेसाठी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातील सर्व २३० जागांसाठी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यानंतर ३ डिसेंबरला इतर सर्व राज्यांसह येथील निकालही जाहीर होतील. दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही पक्षांचे राष्ट्रीय नेते प्रचारासाठी पूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!