देशाचे सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान कोण? नेहरू की मोदी
सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा , जनतेने मोदींचा उत्तराधिकारीही ठरवला
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेक्षणातून जोरदार राजकीय धुळवड पहायला मिळत आहे. देशात मोदी पण राज्यात महाविकास आघाडी असा काैल देण्यात आल्याने समिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. त्यातच आता सी व्होटरने भारतातील आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांपैकी सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण? हे जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

इंडिया टुडे आणि सी व्होटर्सने केलेल्या सर्वेतून ४७ टक्के लोकांनी पीएम मोदींना आतापर्यंतचे लोकप्रिय पंतप्रधान म्हटले आहे. तर १६ टक्के लोकांनी अटलबिहारी वाजपेयींना आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान असल्याचे म्हटलं आहे. तसेच १२ टक्के लोकांनी इंदिरा गांधी यांना, ८ टक्के लोकांनी मनमोहन सिंग यांना आणि ४ टक्के लोकांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान असल्याचा दावा भाजपाकडून नेहमीच केला जातो. या सर्वेक्षणातून भाजपाचा दावा खरा ठरवण्यात आला आहे. पण मोदी लोकप्रियजरी असले तरीही भाजपाला काठावर बहुमत मिळेल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान ऑगस्ट २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत हा सर्वे करण्यात आला होता. यात देशातील लोकप्रिय मुख्यमंत्री कोण याचीही पडताळणी करण्यात आलेली होती.
पंतप्रधान मोदींचा उत्तराधिकारी कोण असेल? असा प्रश्नही या सर्वेक्षणादरम्यान विचारण्यात आला होता. यामध्ये २६ टक्के लोकांनी अमित शाह यांना आपली पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर योगी आदित्यनाथ यांनाही २५ टक्के लोकांची पसंती आहे. तर या सर्वेक्षणात १६ टक्के लोकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पसंती दिली आहे.