Just another WordPress site

अभिनेत्री प्रिया बापट का आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अशी काय बोलली प्रिया, बघा कशामुळे सुरु झाला वाद

मुंबई दि ३(प्रतिनिधी) – मरठीतली गॅमरस अभिनेत्री प्रिया बापटने मराठी बरोबरच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘टाइम प्लीज’ या सिनेमात प्रिया बिंधास्त अशा भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिचा उखाणा विशेष चर्चेत आला होता. दरम्यान त्या उखाण्यामुळे अभिनेत्रीला आता टीका सहन करावी लागत आहे.

GIF Advt

प्रिया बापट झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात दिसली होती. या कार्यक्रमात तिने ‘टाइम प्लीज’ या सिनेमातील उखाणा घेतला. यावरुन प्रियाला आणि झी मराठी चॅनेलला नेटक-यांनी ट्रोल केले आहे. प्रियाने, ‘अच्चीत गच्ची, गच्चीत झाड, झाडाला फुलं, फुलांचा पडलाय सडा, उमेशरावांचं नाव घेते तुमच्या….’ या उखाण्यामुळे प्रियाला ट्रोल केलं जात आहे. युजर्सनी निशाना साधला आहे. एका युजरने ‘महाराष्ट्राची शान वेशीवर टांगून स्वतःला मराठी म्हणवून घ्यायला लाज कशी वाटत नाही’.तर दुस-या युजरने ‘काय फालतूगिरी चालू आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये, असा सवाल विचारला आहे.तर काहींनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.प्रियानेही याच कार्यक्रमात ट्रोलबद्दल बोलताना ट्रोल्समुळे खुप मनस्ताप होतो एक कलाकार म्हणून व्यावसायिक आणि वैयक्तीक आयुष्य आम्हाला वेगळं ठेवायलाच हवं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते आणि जेव्हा ही मर्यादा पार होते तेव्हा मला वाईट वाटतं.असे प्रिया म्हणली होती.

प्रिया अनेकदा तिच्या कपड्यावरुन तर एकदा वेब सीरिजमधील एका सीनच्या क्लिपमुळे ट्रोल करण्यात आले होते.पण उमेशमुळे मी यातुन बाहेर पडल्याचे सांगितले. पण आता तिचा उखाणा तिच्या ट्रोलिंगचे कारण बनला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!