Latest Marathi News
Ganesh J GIF

धक्कादायक! पतीने ब्युटी पार्लरमध्ये जाऊ न दिल्याने पत्नीची आत्महत्या

रागाच्या भरात महिलेने उचलले टोकाचे पाऊल, पोलिसही हैराण, वाचा कुठे घडली घटना

इंदूर दि २९(प्रतिनिधी)- पतीने ब्युटी पार्लरमध्ये जाण्यास नकार दिल्याने एका ३४ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. ब्युटी पार्लरमध्ये जाण्यावरून या दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात महिलेने टोकाचे पाऊल उचलले. ही घटना गुरुवारी शहरातील एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. रीना यादव असे या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बलराम यादव आणि रीना यांच्या लग्नाला १५ वर्ष झाली आहेत. बलराम घरातच टेलरींगची काम करतो तर रीना त्याला त्याच्या कामात मदत करत असे. रीनाने आपण ब्युटी पार्लरला जात असल्याचे पती बलराम यादवला सांगितले. पण बलरामने पार्लरमध्ये जाण्यास नकार दिला तेव्हा रीना खोलीत गेली आणि दरवाजा बंद केला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्याला संशय आला, त्यानंतर त्याने डोकावून पाहिले असता रीनाने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर दरवाजा तोडून तिला खाली उतरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. आता पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलिस उपनिरीक्षक उमाशंकर यादव यांनी सांगितले की, तिच्या पतीने आम्हाला सांगितले की त्याने तिला ब्युटी पार्लरमध्ये जाण्यापासून रोखले. तिने रागाच्या भरात पंख्याला गळफास लावून घेतला. शवविच्छेदन करण्यात आले आहे आणि प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. दरम्यान कुटुंबीयांचे जबाबही नोंदवले जात आहेत. मात्र, पत्नीने उचललेल्या या पाऊलामुळे पतीलाही धक्का बसला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!