पिंपरी चिंचवड- काल पिंपरी चिंचवडमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सूरज काळभोर असे मृत तरुणाचे नाव होते.
त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नी अंकिता काळभोर हिने पतीच्या जाचाला कंटाळून ही हत्या केली आहे.
काय घडले नेमके?
पती सुरज काळभोर हा पत्नी अंकिता हिचे शारीरिक शोषण करायचा.या सगळ्या जाचाला कंटाळून अंकिता काळभोर हिने हे टोकाचे पाऊल उचलत आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला पतीच्या हत्येचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आले होते. शनिवारी रात्री ही सूरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून पती अंकिताने आपल्या पतीचा काटा काढायचे ठरवले.
अशाप्रकारे काढला काटा?
आपल्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहूंजेला न्ह्यायचं ठरवले. यावेळी तिने घरातील सुरा सोबत घेतला. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शन घेतलं. मग दुपारी गहूंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. पत्नी अंकिताने पती सूरज काळभोर चा गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर तिने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला. मात्र पोलिसांना तिच्यावर संशय आला यानंतर त्यांनी तिची कसून चौकशी केली असताना तिने आपला गुन्हा मान्य केला आहे. या प्रकरणी तळेगाव पोलिसांनी अंकिता काळभोरला अटक केली आहे.