Latest Marathi News

त्रिशूळ सरकारच्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

अनेक मंत्र्याची खाती बदलली, भाजप, अजित पवार गटाला महत्वाची खाती, शिंदे गटाची मात्र कोंडी

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचे तब्ब्ल दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या अजित पवार गटाची छाप दिसून आली. महत्वाची खाती मिळवत अजित पवार गटाने एकनाथ शिंदे यांना धोबीपछाड दिले आहे. त्याचबरोबर अर्थ खाते मिळवत शिंदे गटाचा विरोध झुगारून लावला आहे. अजित पवार गटाच्या शपथविधीपासुन कोणाला कोणते खाते मिळणार याची उत्सुकता होती.

आज जाहीर झालेल्या खातेवाटपात भाजपच्या मंत्र्यांकडे असणारी ६ आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली ३ खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील मंत्र्यांना मिळाली आहेत. पण ज्या अर्थ खात्यावरून विस्तार लांबला होता तेच खाते अजित पवार यांनी मिळवले आहे. सोबतच कृषीमंत्री हे खाते देखील अजित पवार गटाला मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात मागील काही दिवस खातेवाटपावर चर्चा होत होती. अखेर खातेवाटपाच्या बऱ्याच बैठकानंतर दिल्ली दरबारी खातेवाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अर्थात सर्वाधिक खाती स्वतः कडे ठेवत देवेंद्र फडणवीस यांनी आपले महत्व अबाधित ठेवले आहे. तर शिंदे गडाकडे कमी महत्वाची खाती राहिल्याने वादाची शक्यता आहे.

अंतिम यादी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार
उपमुख्यमंत्री अजित पवार- वित्त व नियोजन

इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील- सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील- महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम– अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे– गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
अदिती सुनिल तटकरे– महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे– क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!