Latest Marathi News
Ganesh J GIF

‘या’ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरणार?

सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर या तारखेला होणार सुनावणी?, शिंदे गटाची अस्वस्थता वाढली, भाजपाचा प्लॅन बी तयार?

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईला वेग आला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून सुरु होणार आहे. यासाठी उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदेंनाही नोटीस पाठवली जाणार आहे. या निकालाकडे देशाचेही लक्ष राहणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आता वेगवान कार्यवाही करताना दिसत आहेत.

शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांच्या दिरंगाई कामकाजावरून सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिले आहेत. मागील आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती. त्यानंतर आमदारांनी एक आठवडा वेळ मागितला होता. तो संपला असल्याने आता पुन्हा सुनावणी सुरु होणार आहे. दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून विधानसभा अध्यक्षांनी रणनीती ठरवली आहे. केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून या केसमध्ये काम करायचं आहे. याची आठवण सुप्रिम कोर्टाने मागच्या सुनावणीत केली होती. त्यामुळे २५ सप्टेंबरला आमदार आपात्रतेबाबत पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे सोमवारच्या सुनावणीत कशा पद्धतीने कार्यवाही होते आणि पुढची तारीख विधानसभा अध्यक्ष काय देतात याची उत्सुकता असणार आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्र ठरविल्यास सरकार वाचविण्यासाठी भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. शिंदे गटावर अपात्रतेची कारवाई झाली तरी, भाजपकडे विधानसभेत १०५ आमदार, अपक्ष आणि छोटे पक्ष तसेच अजित पवार यांच्या गटाचे ४० आमदार मिळून मोठे संख्याबळ आहे. त्यामुळे बहुमताची अडचण नाही. पण अपात्रतेच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडी आणि समीकरणे बदलणार आहेत.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णयासाठी दिल्ली गाठवे लागत आहे. त्यामुळं आमच्या शंकांना बळ मिळते. असं खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यावर शिंदे गटाने देखील त्याला प्रत्युत्तर दिले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!