Latest Marathi News
Ganesh J GIF

भाजपा खासदाराने पातळी सोडली, विरोधकांना म्हटले आतंकवादी भड…

भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे विरोधक आक्रमक, लोकसभेच्या कामकाजातून ते शब्द हटवले, भाजपाची माफी

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- संसदेचे विशेष अधिवेशन सुरु आहे. यात महिला आरक्षण विधेयक संमत करण्यात आले. तसेच यावेळी चांद्रयान ३ च्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा खासदार रमेश बिधुडी यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यांमुळं नवा वाद सुरु झाला आहे. रमेश बिधुडी यांनी बहूजन समाज पार्टीचे खासदार दानिश अली यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला आहे.

भाजपा खासदार रमेश बिधूडी संसदेच्या विशेष अधिवेशनातील चौथ्या दिवशी लोकसभेमध्ये चंद्रयान-३ च्या यशावर बोलत होते. तेव्हा भाजपा खासदार दानिश यांनी काहीतरी टिप्पणी केली. त्यामुळे बिधूडी यांनी वादग्रस्त विधान केले. रमेश बिधूडी यांनी लोकसभेत खासदाराला उद्देशून भडवा, कटवा, मुल्ला, आतंकवादी आणि उग्रवादी अशा प्रकारच्या असंसदीय शब्दांचा प्रयोग केला. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे बिधुडी यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिधुडी यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. बिधुडी यांच्या वक्तव्याबद्दल बिर्ला यांनी नाराजी व्यक्त करत भाषेच्या मर्यादेचं उल्लंघन करु नये, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रमेश बिधुडी यांच्या आपत्तीजनक वक्तव्यासंदर्भात लोकसभेत माफी मागितली आहे. विशेष म्हणजे बिधुरी वादग्रस्त वक्तव्य करत असताना त्यांच्या पाठीमागे बसलेले केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि रविशंकर प्रसाद हे हसताना दिसत होते. तसेच संसदीय कामकाजातून बिधुरी यांचे वक्तव्य वगळण्यात आले आहे. आता बिर्ला काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि टीएमसीने भाजवर टीका केली. काँग्रेसने एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरम्यान रमेश बिधुडी यांनी संसदेत घडलेल्या घटनेवर बाहेर टिप्पणी करणार नाही, असं म्हटले आहे. काँग्रेस, टीएमसी, आपसह विविध विरोधी पक्ष नेत्यांनी भाजपवर रमेश बिधुडी यांच्या वक्तव्यामुळं टीकेची झोड उठवली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!