
नाना पटोले लवकरच शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार?
काँग्रेसबरोबर राष्ट्रवादीही नाना पटोलेंवर नाराज, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाही आहेत. कारण नाना पटोलेंवर अगोदरच त्यांच्या पक्षातील नेते नाराज असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. पण आता महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष राष्ट्रवादीने देखील नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नाना पटोले पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीपासून नाना पटोले सातत्याने अडचणीत येत आहेत. त्यांच्यावर पक्षातील नेते नाराज आहेतच पण काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले,”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांना महिन्याचा एक खोका नाना पटोलेंना मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष कधी नवीन सरकारच्या प्रमुखांवर बोलताना दिसत नाहीत, पण उपमुख्यमंत्री आणि भाजपाच्या विरोधात बोलताना सातत्याने दिसतात. याच्यामागे तो खोका कारणीभूत आहे का? अशी चर्चा मुंबईत केली जात आहे. याचे योग्य ते पुरावे देईन, असा आरोप करताना माझी वक्तव्ये ही पक्षविरोधी नाहीत. तर मी पक्षाच्या हितासाठी वेळोवेळी भूमिका घेतली. असा दावा केला आहे. त्याचबरोबर नाना पटोले गुवाहाटीच्या वाटेवर असल्याचे सांगत गाैप्यस्फोट केला आहे.तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा निवडणुका त्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्याबरोबर समन्वय होत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
नाना पटोलेंवर सगळीकडून आरोपांची मालिका सुरु असताना अतुल लोंढे पटोलेंच्या मदतीसाठी सरसावले आहेत.देशमुख हे पक्षातील वरिष्ठांवर नेत्यांवर सातत्यानं टीका करत असतात. यात कधी ते आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,राहुल गांधी किंवा नाना पटोले यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करतात. तर त्यांचं मानसिक संतुलन तपासण्याची गरज आहे. अशा शब्दात टिका केली आहे.