
‘ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी भाजप प्रयत्न करणार’
ठाकरे शिंदेच्या दिलजमाईसाठी भाजपाचा आग्रह? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- आजघडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही अशी परिस्थिती आहे. पण ठाकरे आणि शिंदे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आलं पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे विधान राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री आणि चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे जोरदार चर्चा होत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे विधान केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरूद्ध शिंदे वाद रंगला आहे. अशातच, चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे आणि शिंदे यांना पुन्हा एकत्र आणण्याचं विधान केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी एकत्र आले पाहिजे. मला आदेश आल्यास दोघांना एकत्र आणण्यासाठी मी पुढाकार घेईल,सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यावर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होईल. जे थांबले आहेत ते येतील हे सांगायला देखील पाटील विसरले नाहीत. यावेळी शिवसेना आणि भाजप युती तुटण्याला पाटील यांनी संजय राऊत यांना जबाबदार ठरवले आहे. राऊतांचा कावा काय हे लक्षात घेऊन काही लोक वागले. जे भरीस पडले त्याचं नुकसान झाले. असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी संजय राऊतांवर टिका केली आहे. पण ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याने राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा रंगल्या आहेत.
शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते दररोज एकमेकांवर टीकेचा भडीमार करत आहे. काही ठिकाणी तर अगदी हाणामारी प्रयत्न प्रकरण गेले आहे. शिंदे गटाकडून ठाकरेंवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप होत आहे तर ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणून संबोधले जात आहे.