Latest Marathi News
Ganesh J GIF

राष्ट्रवादीचे राजन पाटील भाजपात प्रवेश करणार?

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट, राष्ट्रवादीत अस्वस्थता, भाजपाला भेटणार बळ

सोलापूर दि २३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सोलापूर जिल्ह्यातील नेते राजन पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राजन पाटील यांनी सुचक वक्तव्य करत भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ येथील घरी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत गेले होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, “मोहोळ मतदारसंघातील मतदारांनी पन्नास वर्षांपासून आमचे नेतृत्व मान्य केले आहे. नागरिकांचा जो निर्णय असेल, तो माझा निर्णय असणार आहे. नागरिक जो निर्णय देतील, तो मला शिरसावंद्य असेल. सत्तेसाठी किंवा इतर कशासाठी दुसरीकडे जाणारा मी माणूस नाही. मतदारांना सोडून मी जाऊन काय उपयोग होईल? मतदारसंघाचा निर्णय व्हायला वेळ लागू शकतो. योग्य वेळ आली की निर्णय घेतला जाईल. त्यामुळे जनतेवर जबाबदारी टाकली आहे. जनतेची इच्छा असेल, की मी भाजपमध्ये जावं, तर मी निर्णय घेईन. असे राजन पाटील म्हणाले आहेत. मागील. अनेक दिवसापासून राजन पाटील यांच्या भाजपा नेत्यांच्या गाठीभेठी वाढल्या आहेत. तर अनेकदा त्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे राजन पाटील भाजपात गेल्यास तो राष्ट्रवादीला मोठा धक्का असू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवनिर्माण राष्ट्रवादाचा विचार वाढवण्यासाठी पाटील यांच्या निवासस्थानी भेटीसाठी आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. या दौऱ्याचा उपयोग माझ्या पक्षवाढीसाठी झाला तर मला आनंदच होईल, असे सुचक वक्तव्यही सावंत यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!