Just another WordPress site

शरद पवारांना भाजपसोबत युती हवी होती पण…

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा गाैप्यस्फोट, पहाटेच्या शपथविधीवरुन साधला निशाना

पुणे दि २३(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक चांगलीच लक्षवेधी ठरताना दिसत आहे. कारण निवडूक जरी कसबा आणि चिंचवडची असली तरी मुद्दे मात्र राज्याच्या राजकारणाचे चर्चिले जात आहेत. त्यात गाैप्यस्फोटाची मालिकाही सुरूच आहे. आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक विधान करत खळबळ उडवून दिली आहे.

GIF Advt

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपसोबत युती हवी होती. मात्र, देवेंद्र फडणवीस हे त्यांना मुख्यमंत्री म्हणून नको होते, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होऊ नयेत यासाठी शरद पवार कोणत्याही स्तराला जाऊ शकतात असेही बावनकुळे म्हणाले आहेत. कारण देवेंद्र फडणवीस एकदा मुख्यमंत्री झाले की, महाराष्ट्रात १५ वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळणार नाही. १५ वर्ष महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता असेल ही भीती शरद पवार यांना वाटत होती. म्हणून शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत असे वाटत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. त्याचबरोबर फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून पवारांनी क्लुप्त्या आणि युक्त्या लढवत असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. यावेळी बावनकुळे यांनी भाजपाचा विजय निश्चित असल्याचेही विधान केले आहे.

पहाटेच्या शपथविधीमुळेच राज्यातील राजकारण अगोरदव पेटले आहे. फडणवीस यांच्या दाव्यानुसार पहाटेच्या शपथविधीला पवारांचा पाठिंबा होता असे विधान केले आहे. त्यात काल शरद पवार यांनी त्यातच पहाटेच्या शपथविधीमुळे राष्ट्रपती राजवट उठली असे पवार म्हणाले होते त्याचीही चर्चा होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!