शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?
वेळ आणि ठिकाणही ठरले, समर्थकांना उत्सुकता, काका पुतणे एकत्र आल्याने राजकारण बदलणार?
पुणे दि १०(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फुटीचे राजकारण होताना दिसत आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. पवारांनी ४० ते ५० आमदारांच्या पाठिंब्याने बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. पण आता लवकरच पवार काका पुतणे लवकरच एकत्र येणार आहेत.
आठवडाभरापुर्वीच अजित पवार यांनी पक्षात बंड केले. त्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांचे चांगलेच तोंडसुख घेतले होते. दोन्हीबाजूंनी आपलाच पक्ष खरा असा दावा करण्यात येत आहे. पण आता शरद पवार आणि अजित पवार लवकरच एकत्र येणार आहेत. पुण्यात १ ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमानिमित्त अजित पवार-शरद पवार एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रम पुण्यात होणार आहे. यंदाचा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. यानिमित्त मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदि नेते उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादीमध्य फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येऊ शकतात. त्यामुळे दोघे समोरासमोर आल्यानंतर काय बोलणार याची उत्सुकता अनेकांना असणार आहे. दरम्यान लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते यंदा हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे.
राष्ट्रवादीमध्ये बंड करूनअजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर अजित पवार यांनी शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवत खरी राष्ट्रवादी आपलीच म्हणत पक्ष व पक्ष चिन्हावर दावा ठोकला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष घोषित केले आहे.