महाराष्ट्राच्या राजकारणात २१ नोव्हेंबरला राजकीय भूकंप होणार?
महायुतीत या कारणामुळे अजित पवार गट नाराज, बैठकीत मोठा निर्णय घेणार?, शिंदे पवार गटात कुरघोडीचे राजकारण
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षात बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली. पण आता अर्थमंत्री हे पद असलेला अजित पवार गट निधी मिळत नसल्यामुळे नाराज झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना शिवसेनेचे आमदार ज्या कारणामुळे नाराज होते. नेमका तसाच त्रास आता अजित पवार गट नाराज झाला आहे. त्यामुळे अजित पवार लवकरच आपल्या आमदारांची बैठक घेणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच बदलेले आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार देखील पक्षात बंडखोरी करत भाजपाला साथ दिली. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सर्व काही आलबेल असल्याचा दावा करत असले, तरीही अजित पवार गट निधी वाटपावरून नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या अनेक बैठका आणि कार्यक्रमांना असलेली अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांची येत्या २१ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. ती बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचा शिंदे गटावर आक्षेप आहे. निधीवाटपात आम्हाला डावलले जात आहे, असे राष्ट्रवादीच्या आमदारांचे म्हणणे आहे. महायुतीमध्ये येताना आम्हाला देण्यात आलेल्या शब्दाप्रमाणे निधी मिळत नाही, असा दावाही अजित पवार गटाच्या आमदारांनी केला आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाहा यांची भेट घेतली होती. यावेळी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरला अजित पवार गट कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिंदे गटाने निधी वाटपाचे कारण देत वेगळी चुल मांडली होती. त्यामुळे अजित पवार गट सत्तेतून बाहेर पडणार की, नाराजी दुर होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भुकंपाची चर्चा होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमध्ये निधीवाटपावरुन होत असलेला दुजाभाव हे सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं शिंदे गटातील आमदारांनी सांगितलं होतं. पण आता अजित पवार अर्थमंत्री असूनही त्यांच्या आमदारांना निधी भेटत नसल्याने खरा अर्थमंत्री कोण? अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.