Latest Marathi News

ही अभिनेत्री या अभिनेत्यासोबत मार्चमध्ये विवाहबंधनात अडकणार?

वेडिंग डेस्टिनेशनबाबत खुलासा करत म्हणाली मी तयार आहे, बघा कुठे करणार लग्न

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजकाल बाॅलीवूडमध्ये स्टार लग्न करताना दिसत आहेत. आता त्यात आणखी एकाची भर पडली आहे. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची प्रेमकहाणी बिग बॉसमध्ये सुरू झाली आणि तिथून बाहेर पडल्यानंतर दोघेही एकत्र आहेत. आणि ते लग्न बंधनात अडकणार आहेत.


करनने एका रेडिओला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. करण कुंद्रा लग्नाच्या मुद्द्यावर म्हणाला की, ‘मी मार्चमध्ये लग्न करण्यास तयार आहे. इतकेच नाही तर करणने हे देखील सांगितले की त्याचे कुटुंबीय देखील लग्नासाठी तयार आहेत, परंतु कामाच्या कमिटमेंटची समस्या आहे. त्याने सांगितले की, तेजस्वीने बिग बॉस संपल्यानंतर नागिनला साइन केले होते. पण आता आम्ही मार्चमध्ये एकत्र येणार आहोत. करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांनी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला. यावेळी अभिनेत्याने स्वतःचे आणि तेजस्वीचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत होते.तेजस्वी प्रकाशबरोबर लग्नाच्या बेडीत अडकण्याबाबतही करणने भाष्य केलं. “लग्नाचा विषय निघाल्यावर मला थोडं टेन्शन येत. पण आम्हाला एकत्र पाहायला चाहत्यांना आवडतं. प्रेक्षकांना आम्हाला एकत्र पाहायचं आहे. आमच्यातील प्रेम व रिलेशनशिप एक स्टेप पुढे गेलेलं लोकांना पाहायचं आहे. ही सुखावणारी भावना आहे अशी भावना त्याने व्यक्त केली आहे.


करण कुंद्रा तेरे इश्क में घायाल या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर परतला आहे, ज्याचे अभिनेत्याने जोरदार प्रमोशन केले आहे. तर तेजस्वी नागिण ६ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाश ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभागी झाले होते. बिग बॉसच्या घरात त्यांच्यातील जवळीक वाढली. त्यानंतर ते आता रिलेशनशिपमध्ये आहेत. तेसस्वी प्रकाश या पर्वाची विजेती ठरली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!