देवाला नमस्कार करत चोराने मारला देवाच्या दागिण्यावर डल्ला
चोरीचा व्हिडिओ व्हायरल, गावकरी आक्रमक, पहा किती वेळा झाली चोरी
जयपूर दि १६(प्रतिनिधी)-जयपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. जयपूरमधील शाहपुरामधील गोनाकासर गावात एका चोराने देवाचे दर्शन घेत देवाच्या छत्राची चोरी केली आहे. या चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुजा-याने सकाळी देवाची पूजा केली त्यावेळी छत्र होते. पण त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी पाच वाजता पूजा करण्यासाठी पुजारी गेले तेव्हा चोरी झाल्याची कल्पन आली. यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चांदीच्या छत्राची चोरी दुपारी दीड वाजता झाल्याचे लक्षात आले. पुजाऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाजारात त्या छत्राची किंमत दोन लाख रुपये आहे. व्हिडिओत दिसत आहे की चोर चोरी करण्यासाठी मंदिरात घुसला गाभाऱ्याचा दरवाजा बंद करत देवाला नमस्कार करतो आणि चांदीचं छत्र काढून आपल्या शर्टच्या आत लपवत पळ काढतो. याचा व्हिडिओही समोर आला आहे.
पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या मंदिरात सहा महिन्यात आतापर्यंत तिसऱ्यांदा चोरी झाली आहे. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलन केले आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.