Latest Marathi News
Ganesh J GIF

नॅशनल क्रश असणारी ही अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात?

अभिनेत्रीचे ते फोटो सोशल मिडीयावर तुफान व्हायरल, या प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर घेणार सात फेरे

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या अनेक जोड्या लग्नबंधनात अडकत आहेत. तर तेच लोन आता साऊथकडील टाॅलीवूडमध्ये पोहोचले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

रश्मिका आणि विजय दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण आता दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान ही चर्चा सुरु होण्यामागे एक फोटो कारण ठरला आहे. दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रश्मिकाने अलीकडेच एका लग्नसोहळ्यातील तिचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोसह तिच्या एकटीचे साडीतील काही फोटोही तिने पोस्ट केले आहेत.हे फोटो तिचा असिस्टंट साई बाबूच्या लग्नसोहळ्यातील होते. पहिल्या फोटोमध्ये रश्मिकाने पिवळसर रंगाची साडी नेसून कपलसोबत दिसत आहे. त्यानंतर तिने घराच्या बाल्कनीमध्ये फोटो काढले आहेत. शेवटचे दोन फोटो विजयच्या घरातील आहेत. कारण विजयनेदेखील काही दिवसांपुर्वी याच लोकेशनवरुन एक फोटो अपलोड केला होता. त्यामुळे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु झाली आहे. या फोटोवरुन ते दोघे लिव्हइनमध्ये राहात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच दोघांनीही त्यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. अर्थात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना या दोघांचे नाव एकत्र घेण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी मालदीवच्या ट्रिपवरून दोघांच्या नात्यांची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती.

विजय आणि रश्मिकाचे ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉमरेड’ हे चित्रपट तुफान हिट ठरले. या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली  रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!