Latest Marathi News
Ganesh J GIF

तब्बल २९ वर्षांनंतरही सुप्रियाताई विसरल्या नाहीत ‘तो’ आपुलकीचा धागा

राजकारणापलीकडील प्रेमाच्या नात्याची सुंदर भेट, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)- शरद पवार यांचा उल्लेख नेहमी एक मुरब्बी राजकारणी म्हणुन केला जातो. पण माणसांना आपलेसे करण्याचा त्यांचा गुणही खुपच खास. आहे. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी माणसे जोडून ठेवली आहेत. याचा अनुभव नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांना आला आहे. त्यांनी २९ वर्षाच्या ऋणानुबंधाची भेट फेसबुक लाईव्ह करत सर्वांबरोबर शेअर केला आहे.

सुप्रिया सुळे सोलापूर दाै-यावर आहेत. नेहमीप्रमाणे त्यांच्या गाठीभेटी सुरु असतात.पण छाया पाटील आणि त्यांचा मुलगा धनंजय पाटील यांनी घेतलेली भेट खास असल्याचे सांगत सुळे यांनी किल्लारीच्या वेळेची आठवण सांगितली आहे. किल्लारीचा भूकंप आठवला की अनेकांच्या अंगावर शहारा येतो. आज त्या भुकंपाला २९ वर्ष पूर्ण होत आहेत. पण या भुकंपावेळी शरद पवार यांच्या नियोजनबद्धतेबरोबरच दुरदूष्टीचा महाराष्ट्राला प्रत्यय आला. तेंव्हा मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी किल्लारीसह इतर उध्वस्त झालेली गावं नुसतीच उभी केली नाहीत तर ती नांदती केली. यावेळी त्यांनी पूर्ण मंत्रीमंडळच सोलापूरात आणले होते. शासकीय विश्रामगृहावर त्यांच्या मुक्काम असायचा. पण सतत किल्लारीची भेट, इतर कामे यामुळे त्यांचे वेळेवर जेवण होत नव्हते. यावेळी छाया पाटील या पवारांना जेवणाचा डब्बा द्यायच्या. पवारांना भाकरी, पिठलं,ठेचा असे जेवण आवडायचे म्हणून त्या आवर्जुन त्यांच्या आवडीचे जेवण जोपर्यंत ते सोलापूरात होते,तोपर्यंत देत होत्या. त्यांनी फक्त पवारांचेच नाही तर किल्लारीमधील लोकांसाठीही जेवण बनवायच्या, रोज दिडशे ते दोनशे डब्बे त्या आपले पती दिलिप पाटील यांच्या मदतीने तयार करुन द्यायच्या. सुशीलकुमार शिंदे यांनाही त्या आपले हातचे जेवण आवर्जून द्यायच्या. ही आठवण सांगत सुळे यांनी पाटील यांचे आभार मानले आहेत. संकटाच्या काळात किल्लारीतील लोकांनाही जेवणाचे डब्बे दिल्याबद्दल त्यांनी छाया पाटील आणि कुटुंबीयांचे काैतुक केले. तब्बल २९ वर्षापूर्वीच्या नात्याचा ओलावा या निमित्ताने महाराष्ट्राला पहायला मिळाला

या भेटीबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की “पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीची आज महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात जी काही ओळख आहे ती आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेमुळेच आहे. त्यांनी साथ दिल्यामुळे हे सर्व काही शक्य झाले आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांनी प्रेम दिले त्याबद्दल आम्ही कायम महाराष्ट्राचे ऋणी राहू” असे सुळे म्हणाल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!