Latest Marathi News
Ganesh J GIF

या आमदाराच्या त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अजित पवार गटाचा आमदार अडचणीत, सुसाईड नोटमध्ये आमदार पत्नीवरही आरोप, प्रकरण काय?

नाशिक – कळवणचे आमदार नितीन पवार व पत्नी जयश्री पवार यांच्या विरोधात काम केल्यामुळे ग्रामसेवक असणाऱ्या पतीला त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी विषारी औषध घेऊन जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिकमधील कळवण येथील काँग्रेस तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याआधी महाजन यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं शीतल महाजन यांनी लिहिलं आहे. विधानसभा निवडणुकीत माझ्या नवऱ्याने आमदार नितीन पवार यांच्या विरोधात काम केलं. त्यामुळे पवार वारंवार माझ्या नवऱ्याला त्रास देतायत, असं शीतल महाजन यांनी म्हटलं आहे. नितीन पवार हे त्यांच्या पदाचा गैरवापर करत आहेत. ते वारंवार शीतल यांचे पती रामराव महाजन यांना त्रास देत होते. पवारांमुळे महाजन दाम्पत्याला मानसिक त्रास झाला. या त्रासाला वैतागून शीतल महाजन यांनी आत्महत्या केली. रामराव महाजन यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी नितीन पवार यांच्या विरोधात काम केलं. पवारांच्या मनात या गोष्टीचा राग होता. त्यामुळे त्यांनी ग्रामसेवक रामराव महाजन याच्या कारभाराची चौकशी सुरु केली. त्यांनी विधानसभा अधिवेशनात लक्षवेधीही सादर केली. नवऱ्याचं निलंबन होईल तसेच कुटुंबाची बदनामी होईल ही भीती शीतल यांना वाटत होती. नवऱ्याला होणारा त्रास सहन न झाल्याने शीतल यांनी विषारी औषधाचं सेवन केलं. शीतल यांचे भाऊ योगेश गायकवाड यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. शीतल महाजन यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

नितीन पवार हे कळवण – सुरगाणा मतदारसंघातले अजित पवार गटाचे आमदार आहेत. तर रामराव महाजन हे अभोणा गावचे ग्रामसेवक आहेत. रामराव महाजन यांची बायको शीतल महानजन कळवण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. त्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते काशीनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!