Latest Marathi News

हडपसरमध्ये परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार

बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार,पुण्यात महिला आहेत असुरक्षित

पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारी कृत्याबरोबरच महिला अत्याचारात देखील वाढ झाली आहे.आजही पुण्यातील हडपसरमध्यर बंदुकीचा धाक दाखवून परराज्यातून आलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुण्यात उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आली होती. त्यामुळे ती महिला पुण्यात राहण्यासाठी भाड्याने घर शोधत होती. त्यावेळी तिची ओळख संजय बाजीराव भोसले याच्याशी झाली. त्याने महिलेला रुम भाड्याने देतो असं म्हणत हडपसर भागात बोलावून घेतले आणि बंदुकीचा धाक दाखवत त्या महिलेवर अत्याचार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली. हा प्रकार हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत ५ जानेवारी रोजी घडला आहे. त्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले याला उरळी कांचनमधून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोल तपास करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!