Latest Marathi News
Ganesh J GIF

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार

वेळ आणि तारीखही ठरली, या गोष्टीमुळे पुन्हा शिवसेना एकसंध होणार?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह बाहेर पडले होते. यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बरेच वादही झाले. पण आता ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आहेत.

विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं २३ जानेवारीला अनावरण होणार आहे. त्यानिमित्ताने शिंदे, फडणवीस, ठाकरे एकत्र येणार आहेत. प्रशासनाकडून सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. तसंच उद्धव ठाकरे यांना अद्याप निमंत्रण दिलेलं नसलं तरी प्रशासनाकडून ते देण्यात येणार आहे. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याची घोषणा नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सध्या तरी दोन्ही नेत्यांमधून विस्तवही जात नाही. परंतू आता ठाकरे आणि शिंदे एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकदाही एकत्र आलेले नाहीत. ते एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन,गायिका आशा भोसले यांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ठाकरे या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण जर हे निमंत्रण उध्दव ठाकरेंनी स्वीकारले तर प्रथमच ठाकरे आणि शिंदे हे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!