जागा मिळवण्यासाठी मुंबई लोकलमध्ये महिलांची कुस्ती
महिलांमधील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल,फ्री स्टाईल कुस्ती बघाच
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- लोकल ट्रेन आणि वाद हे समीकरण आता नवीन राहिलेले नाही. बसायच्या जागेवरून वाद ठरलेले असतात.पण अलीकडे महिलांमध्ये होत असलेल्या वादात वाढ झाली आहे. त्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. आता आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या महिलांनी एका सीटसाठी केलेली फ्री स्टाईल कुस्ती केली आहे.
महिलांच्या विशेष डब्यामध्ये नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दी होती. मुंगीलाही शिरायला जागा नव्हती. अशा स्थितीत २ महिलांमध्ये बसण्याच्या जागेवरून पहिल्यांदा वादावादी झाली. पण ही वादावादी पुढे वाढत जात त्याचे रुपांतर भांडणात झाले. त्यांनंतर हे भांडण इतकं वाढलं की महिलांनी एकमेकींच्या झिंज्या धरत हाणामारीच सुरु केली.नंतर या भांडणात इतर महिलाही सहभागी झाल्या. यावेळी एकमेकेंची यच्छेद धुलाई करण्यात आली. पण हे भांडण सोडवण्यासाठी कोणीच आले नाही.पण ही हाणामारी अनेकांनी आपल्या कॅमे-यात कैद केली आहे. अलीकडे लोकलमध्ये महिलांंमधील हाणामारी व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. हाणामारीचा हा व्हिडीओ @RoadsOfMumbai या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर The Spirit of Mumbai अशी कॅप्शन देण्यात आले आहे.

Spirit of Mumbai – Part 4pic.twitter.com/CoyXl8TrPq
— Roads of Mumbai 🇮🇳 (@RoadsOfMumbai) October 16, 2022
अलिकडेच पनवेल-ठाणे लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हाणामारीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. अनेकदा भांडण केल्याशिवाय बसण्यासाठी जागाच मिळत नाही असा पवित्रा प्रवाशांमध्ये पाहायला मिळतो. तर नेरुळमध्येही महिला प्रवाशांमध्ये अशीच हाणामारी व्हायरल झाली होती. त्यामुळे लोकल डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी होत आहे.