ईडीकडून चाैकशीची शक्यता अजित पवार अडचणीत
शिंदे फडणवीस सरकार 'या' प्रकरणाची पुन्हा चाैकशी,बघा काय आहे प्रकरण
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ७६ संचालकांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार आणि ७६ संचालकांची पुन्हा ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण साखर कारखाने विक्री व्यव्हाराशी निगडीत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात झालेल्या चौकशीचे हे प्रकरण पुन्हा रडारवर आलं आहे. त्याचं कारण म्हणजे, महाविकास आघाडी सरकारनं दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर याप्रकरणी अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्याला उत्तर देताना आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयाला पुन्हा चौकशी करण्याचं लेखी कळवले आहे. या याचिकांमध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या याप्रकरणातील भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांची चौकशी न करताच क्लोजर अहवाल दिला असल्यामुळे न्यायालयात विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
२००१ ते २०११ या काळात २३ सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेने तारण न देता कर्ज दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. यानंतर, शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करण्यात आला होता.त्यामुळे अजित पवार यांची ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी होणार असल्याचे समोर आले आहे.