Just another WordPress site

खुशखबर! सीएनजी, पीएनजीची सहा ते सात रूपयांनी स्वस्त

दिवाळीच्या तोंडावर सरकारचा जनतेला दिलासा, पहा अजून कोणता दिलासा?

गुजरात दि १७(प्रतिनिधी)- एैन दिवाळीच्या तोंडावर सरकारने सीएनजी आणि पीएनजीच्या किमती कमी करण्यासाठी १० टक्के व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पीएनजी आणि सीएनजीच्या किमतीत ग्राहकांना ६ ते ७ रुपये किलोचा फायदा मिळणार आहे. पण हा फायदा गुजरातच्या जनतेला मिळणार आहे.

GIF Advt

गुजरातमध्ये वर्षअखेर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपाने जनतेला खूश करण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. सरकारने सीएनजी, पीएनजीच्या किमती कमी करण्याबरोबरच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात २ सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर गुजरातमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना – मुख्यमंत्री अमृतम आयुष्मान कार्डचे वितरण देखील सुरू करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील दुर्बल घटकांना होणार आहे. यंदाच्या गुजरात निवडणूकीत भाजपासमोर आपने मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. अजून आचारसंहिता जाहीर न झाल्यामुळे सीएनजी पीएनजीच्या वाढलेल्या किमती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचा थेट फायदा १४ लाख सीएनजी वाहन चालकांना होणार आहे.

गुजरातमधील सर्व राजकीय पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत. या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षही जोरदारपणे लढत देत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते सर्व पक्षांच्या नेत्यांच्या गुजरात भेटी वाढल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व शीर्ष नेते गुजरात दौऱ्यावर येत निवडणुकीची तयारी करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!