लोणावळ्यातील या हाॅटेलवर तरुण तरुणींचा नंगानाच
लोणावळ्यातील न्युड पार्टीचा प्रकार समोर, हॉटेल चालकांचे धाबे दणाणले
पुणे दि ४(प्रतिनिधी)- लोणावळातील व्हिस्प्रिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण तरुणींनी न्युड पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर मोठ्या आवाजात गाणी लावून अश्लील नृत्य करणाऱ्या ५३ जणांना लोणावळा पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये ४४ पुरुष आणि ९ तरुणींचा समावेश आहे. या कारवाईने लोणावळा परिसरात हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

लोणावळा परिसरात पर्यटनासाठी अनेकजण येत असतात. असेच लोणावळा येथील व्हिस्प्रिंग वुड्स हॉटेलमध्ये तरुण तरुणींचा ग्रुप मोठ्या आवाजात गाणी लावून नग्न होत अश्लील नृत्य करत असल्याची माहिती लोणावळा उपविभागाचे उपअधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी ४४ पुरुष व ९ महिला असे एकूण ५३ जण गाण्यावर अश्लील नृत्य करुन विविस्त्र चाळे
करुन नियमाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कारवाई करत सर्व पुरुष व महिलांना ताब्यात घेऊन साऊंड सिस्टम जप्त केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदिप अजिनाथ बोराडे यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ५३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई लोणावळा विभागातील पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळालेल्या माहितीवरुन लोणावळा शहर पोलिस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांनी केली आहे. लोणावळ्यातील ही मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.