Latest Marathi News

राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे शिंदे गटाच्या वाटेवर?

फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण, बंडाने राष्ट्रवादीत फुटीची शक्यता

पुणे दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि पिंपरी मतदारसंघाचे आमदार आण्णा बनसोडे यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. पण आता बनसोडे यांच्या एका पोस्टमुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. पण काही दिवसांपूर्वी आण्णा बनसोडे आणि अजित पवार यांच्यात बिनसले असल्याची चर्चा आहे. त्यानंतर आगामी निवडणुकीमध्ये पिंपरीमधून नव्या उमेदवाराला राष्ट्रवादी तिकीट देणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने बनसोडे अस्वस्थ आहेत. त्यामुळे आगामी समीकरणाचा विचार करत शिंदे गटात जाण्याच्या इराद्यात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या फेसबुकवरील एका पोस्ट लिहिली आहे त्यात  दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना, त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे..माननीय आमदार अण्णा साहेब बनसोडे… राजकरणापलीकडची मैत्री, असे लिहिण्यात आल्याने बनसोडे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच बनसोडे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादीच्या अडचणी वाढू शकतात. महत्वाचे म्हणजे बनसोडे यांच्यासोबत पिंपरी चिंचवड महापालिकेतील अनेक नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!