पुणे दि ३(प्रतिनिधी)- अंधारच होता ज्यांच्या नशिबी, त्यांना प्रकाशाचे दान दिलं! तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला संविधानही दिलं. भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटनेची अंमलबजावणी या देशात करण्यात आली.या दिवसापासून जगाच्या पाठीवर आपला देश ‘ भारत’ या नावाने अस्तित्तवात आला. त्यापूर्वी ब्रिटिशांची मांडलिक संस्थाने व ब्रिटिश अमलाखालील प्रदेश मिळून भारत अस्तित्वात होता.
स्वातंत्र्याची चळवलं करणारे लोक या प्रदेशाचा उल्लेख हिंदुस्थान असा करत, राज्यघटनेत या सर्वांचे विसर्जन करून भारत असे नाव देण्यात आले. या राष्ट्राचे राजकीय आर्थिक, व सामाजिक तत्वज्ञान कोणते असेल, हे लिखित स्वरूपात निर्धारित केले आहे. त्यास संविधान सभेची आणि पर्यायाने भारतीय जनतेचीही मान्यता मिळाली आहे. भारतीय संविधानाची रचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच केली असल्यामुळे संविधानाने निर्माण केलेल्या भारत या राष्ट्राचे जनकत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडेच जाते. ” शिक्षण हे वाघिणीचे दूध आहें आणि जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही” अशी डरकाळी फोडणारे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.त्यांनी स्व-अनुभवातून तत्कालीन सामाजिक परिस्थिती पाहून भविष्याचा वेध घेत भावी पिढीला कानमंत्र दिला. त्याचा प्रत्यय आज भारताचा भौतिक विकास, राजकीय आणि सामाजिक स्तिथीवरून येत आहें. हे त्यांच्या लेखणीतून उतरलेल्या संविधानाच्या नियमांचे परिणाम आहेत.
स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता हे ब्रीद बाबासाहेबांचे होते. त्यांच्या स्वप्नातील भारत या ब्रीदाप्रमाणे घडायला हवा होता. परंतु तत्कालीन परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीचा विचार केला तर, जगात आर्थिक महासत्ता बनू पाहणाऱ्या २० देशाच्या रांगेत भारताचा क्रमांक लागतो. बाबासाहेबांनी सर्वात जास्त महत्व शिक्षणाला दिले होते. म्हणूनच ते म्हणायचे ‘शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा. अप्रत्यक्ष शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष शिक्षणाचा जन्म होतो. आणि दोन्ही शिक्षणातून प्रथम माणूस घडतो. त्याचं क्षणी समाजही घडत असतो. त्यांचे साक्ष देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. कारण दिवसातून २४ तासापैकी १८ ते २० तास अभ्यास करणाऱ्या बाबासाहेबांना दिवस पुरत नव्हता म्हणून ते रात्री वारा,थंडीची तमा न करता रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करत होते.
शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर ही पदवी घेऊन मायदेशी परतल्यावर त्यांनी विद्याथ्यांना जागृत व्हा असा नारा दिला. कारण समाज परिवर्तन घडवून आणण्याची आणि नवक्रांती घडवण्याची ताकत केवळ विद्यार्थ्यांमध्येच आहे असा दृढ विश्वास बाबासाहेबांना होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रबांधनीची संकल्पना व वर्तमान भारतात रुजविण्यात येत असलेल्या राष्ट्रबांधनीची संकल्पना यांची तुलना केल्यास वर्तमान काळात देशापुढे उद्धभवलेल्या अनेक समस्यांचे उत्तरे मिळू शकतात.
राष्ट्राची प्रयत्नपूर्वक निर्मिती करावी लागते. वर्तमान भारतात राष्ट्र ही संकल्पना अत्यंत ढोबळ स्वरूपात वापरण्यात येते. बहुसंख्य लोकांना असे वाटते की, विशिष्ट चालीरीतीचे पालन करणारे समान श्रद्धास्थानांशी, प्रतिकांशी, परंपराशी, पूजाविधीशी बांधिलकी मानणारे व विशिष्ट सीमारेषानी निर्धारीत केलेल्या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांचे मिळून राष्ट्र बनते. २६ नोव्हेंबर,१९४९ रोजी घटनासमितीपुढे केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,’संविधानाच्या उद्देश पत्रिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दाला राजकीय दृष्टिकोन ठेवणाऱ्या अनेकांनी विरोध केला. त्याऐवजी ‘भारतीय राष्ट्र ‘असा शब्दप्रयोग करावा,असे अनेकांचे मत होते. वर्तमानात भव्यदिव्य घडविण्याच्या जगाला दिपवून सामूहिक इच्छेवर जगत असते. मात्र राष्ट्रातील नागरिकांनी इतिहासाचे भान ठेवणे गरजेचे आहें भारतीय सत्ताधारी उच्चभ्रुंनी राष्ट्रासाठी त्याग करण्याचे आवाहन केले. परंतु भारतीय संस्थानिक राजेरजवाडे आणि सरंजामी प्रवृतीचे जमीनदार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले. आता भारतीय राष्ट्रवाद हा प्रांतवादाच्या कचाट्यात सापडला आहे.