Just another WordPress site

शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर…आम्ही आमच भाग्य समजू..?

मुंबई विशेष प्रतिनिधी – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी थेट ठाकरेंवर टीका केलीये. टीका करताना त्यांनी दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा उल्लेख केला आहे.

‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर..

‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर….तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

GIF Advt

एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीशी युती तोडून भाजपसोबत युती करण्याची शिंदे गटाची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. राष्ट्रवादीशी युती तोडून भाजपसोबत युती करण्याची शिंदे गटाची मागणी आहे.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!