Latest Marathi News
Ganesh J GIF

एकनाथ शिंदेंचा गेम त्यांच्यावर उलटणार? कायदेशीर बाबींमुळे आमदारकी धोक्यात

मुंबई प्रतिनिधी – शिवसेनेकडून 16 बंडखोर आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवण्यात येत आहे. जर कायदेशीरपणे विचार केला तर खरंच त्या आमदारांचा याचा फटका बसू शकतो का? याबाबत शिवसेनेचे  वकील देवदत्त कामत यांनी मोठा खुलासा केला आहे.एकनाथ शिंदेंच्या गटातील बंडखोर आमदार अद्याप दुसऱ्या पक्षात सामील झालेले नाहीत. 2/3 आमदार गुवाहाटीला गेले आहेत. मात्र ते अद्याप दुसऱ्या पक्षात सामील झालेले नाही. त्यामुळे त्याचं पक्षातून निलंबन केलं जाऊ शकतं. आणि त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.त्यामुळे शिंदे गटाकडे या कारवाईपासून वाचण्यासाठी आता एकच पर्याय उपलब्ध आहे, तो दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे.

वकील काय म्हणतात…?

संविधानातील नियमाप्रमाणे जर कोणताही आमदार पक्ष सोडून जात असेल तर त्याला Schedule 10 नुसार कोणा दुसऱ्या पक्षात सामील होणं आवश्यक असतं. आणि एकनाथ शिंदे गटामधील केवळ बच्चू कडू यांच्याकडे दुसरा पक्ष आहे, ज्याचं नाव प्रहार आहे. दुसरं म्हणजे एकनाथ शिंदे यांना भाजपमध्ये सामील होण्याचा पर्यायही आहे. मात्र जर आमदारांनी भाजपमध्ये जाण्यास नकार दिला तर प्रकरण अडचणीचं ठरू शकतं. हे प्रकरण कोर्टातही गेलं तरी एकनाश शिंदे अडचणीत सापडू शकतात.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!