Just another WordPress site

शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल, दिवसभरात होणार राजकीय भूकंप

मुंबई विशेष प्रतिनिधी – शिवसेनेचे आणखी 6 आमदार नॉट रिचेबल आहेत. आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर यांचा संपर्क झालेला नाहीय. दोघेही गुवाहाटीकडे रवाना झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे कुडाळकर आणि सरवणकर शिंदे गटात समिल होणार का याकडे लक्ष लागलंय.

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक गट आपल्या पाठी उभा केला. त्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसतोय. शिवसेनेचे आणखी सहा आमदार सध्या नॉट रीचेबल आहेत. आणि हे सहा आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून, ते आज गुवाहाटीला पोहोचतील अशी माहिती आहे… दुसरीकडे शिवसेनेचे आणखी पाच आमदार मुंबईहून सूरतला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. आणि  सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये त्यांच्या खोल्या आरक्षित असल्याचं कळतंय. एका बड्या पदाधिकाऱ्यावर या आमदारांना सूरतला पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आलेय. सूरतवरून हे आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं कळतंय. आता संपर्काबाहेर असलेले हेच ते आमदार आहेत का हे पाहावं लागणार आहे.

GIF Advt

नॉट रिचेबल असलेले 6 आमदार? 

  • मंगेश कुडाळकर
  • सदा सरवणकर
  • दादा भुसे
  • दीपक केसरकर
  • दिलीप हांडे
  • संजय राठोड
आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!