Latest Marathi News
Ganesh J GIF

उद्धव ठाकरेंच्या भेटीला ‘मातोश्री’वर कधी जाणार? एकनाथ शिंदेंनी सांगितली वेळ…

मुंबई प्रतिनिधी : काल मोठ्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच एकनाथ शिंदे  आपल्या गटातील आमदारांच्या भेटीसाठी आज पहाटेच गोव्याला पोहचले. त्यावेळी, इतर सर्वच बंडखोर आमदारांनी त्यांचे  जंगी स्वागत केले. एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात आपल्या सहकारी आमदारांसोबत जल्लोष केला. तसेच साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. येत्या ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार असून, शिंदे यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र ही केवळ औपचारिकता असून १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला आहे. यावेळी, मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी मातोश्रीला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेल, असे उत्तर त्यांनी दिले.दरम्यान, दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार मुक्कामी आहेत. आता त्यांना सोबत घेऊनच शिंदे मुंबईला पोहचणार आहेत. विशेष म्हणजे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रिपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.दरम्यान, भाजपने आम्हाला साथ दिली. संख्याबळ असूनही त्यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केला नाही. तर बाळासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. हा देवेंद्र फडणवीसांच्या मनाचा मोठेपणा आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!