Latest Marathi News
Ganesh J GIF

10 वर्षांच्या चिमुकल्याला मगरीने नदीतच जिवंत गिळलं…! बघा नेमक तिथ काय घडल…! व्हिडिओ बघा

एक दहा वर्षांचा मुलगा अंघोळ  करत होता. नदीत अंघोळ करत असतेवेळी या मुलावर मगरने झडप घालून हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने दहा वर्षांच्या मुलाला ओढून नदीन खोल नेलं आणि त्याचा फडशा पाडला. दहा वर्षांच्या मुलाला या मगरीने जिवंत गिळलं. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली. मध्य प्रदेशच्या शोपूपमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. मात्र ही घटना इथेच संपत नाही खरा थरार तर यापुढे घडला. चिंबल नदीत अंघोळ करताना दहा वर्षांच्या चिमुकल्याला महाकाय मगरीने गिळल्याचं वृत्त वाऱ्यासारखं संपूर्ण गावभर पसरलं. त्यानंतर संपूर्ण गावाने जे कृत्य केलं, ते अंगावर काटा आणणारं होतं. संपूर्ण गाव एकवटला. चिंबल नदीमध्ये ही घटना घडली होती. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेनंतर गावातील लोकांनी नदीत मगरीचा शोध घेतला. तिला नदीतून बाहेर काढलं आणि आक्रोश सुरु केला. हा सगळा प्रकार अत्यंत थरारक होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.

     स्थानिक गावकऱ्यांनी दहा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूनंतर मगरीशीच दोन हात केले. या मगरीला नदीतून शोधलं आणि तिला नदीतून बाहेरही काढलं. जाळ्या, दोरखंड, काठ्या या सगळ्याच्या मदतीने गावातील लोकांनी मगरीला पकडलं. मगरीला नदीतून बाहेर काढतानाहा हा सगळा थरार कॅमेऱ्यातही कैद झाला. यानंतर या मगरीला गावातील लोकांनी कैद करुन ठेवलं होतं. दहा वर्षांच्या मुलाच्या आईवडिलांना आपला मुलगा मगरीच्या पोटात जिवंत असेल, अशी भाबडी आशा होता. जेव्हा मगर आपल्या मुलाला तोंडातून बाहेर काढेल, तेव्हा आम्ही मगरीला सोडू, अशी भूमिका गावातल्या लोकांनी घेतली होती. सोमवारी सकाळपासून सुरु झालेला हा थरारक प्रकार संध्याकाळी उशिरापर्यंत सुरुच होता. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी बचावकार्य मगरीला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली.

बघा व्हिडिओ 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!