Latest Marathi News
Ganesh J GIF

सिक्कीममधील ट्रक अपघातात १६ जवानांना वीरमरण

चार जवान जखमी, उत्तर सिक्किममध्ये ट्रक दरीत कोसळून अपघात

सिक्कीम दि २३(प्रतिनिधी)- सिक्कीम मधील जेमा येथे झालेल्या रस्ते अपघातात लष्कराचे १६ जवान शहीद झाले आहेत. तीव्र वळणावरुन जात असताना लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले, त्यामुळे हा भीषण अपघात झाला. यावर्षी जवानांच्या गाडीचा हा सर्वात मोठा अपघात आहे. अपघातात चार जवान शहीद झाले आहेत.

भारतीय लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, २३ डिसेंबर २०२२ रोजी उत्तर सिक्कीममधील जेमा येथे लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळले. या भीषण रस्ते अपघातात भारतीय लष्कराच्या १६ जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्त वाहन तीन वाहनांच्या ताफ्याचा भाग होते, जे सकाळी चतनहून थंगूच्या दिशेने निघाले होते. जेमाच्या वाटेवर एका तीव्र वळणावर वाहन घसरले. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरु करण्यात आली आणि चार जखमी जवानांना विमानाने उपचारासाठी हलवण्यात आले आहे.या दुर्घटनेत दुर्दैवाने तीन कनिष्ठ अधिकारी आणि १३ जवान शहीद झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकूल कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे, असे लष्कराने म्हटले आहे. या दुर्घटनेबद्दल अनेक नेत्यांनी दुख व्यक्त केले आहे.


संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ‘उत्तर सिक्कीममधील रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या हौतात्म्याने खूप दुःख झाले. त्या जवानांच्या सेवा आणि समर्पणाबद्दल देश कृतज्ञ आहे. शहीदांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना. या दुर्घटनेत जखमी झालेले जवान लवकरात लवकर बरे व्हावेत अशी माझी इच्छा आहे. सिक्कीममधील या भीषण रस्ते अपघाताने देश हादरला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!