Latest Marathi News
Ganesh J GIF

संतापजनक! शिक्षकाने चक्क शाळेतच केली दारु पार्टी

शिक्षकाचा व्हिडिओ व्हायरल, दारु पिऊन केले किळसवाणे कृत्य

गोंदिया दि २३ (प्रतिनिधी)- गोंदिया जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याअंतर्गत निंबा जिल्हा परिषद शाळेत एक शिक्षक मद्यधुंद अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळून आले. शिक्षक जी. आर. मरसकोल्हे हे दारूच्या नशेत चक्क वर्गातच लोळत होते. अखेर शुद्ध न आल्याने त्यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात नेण्यात आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्याच्या निंबा येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि याच शाळेत जी. आर. मरसकोल्हे हे शिक्षक पदावर कार्यरत आहेत. यांनी शाळेतच दारु पार्टी केली इतकेच करुन न थांबता या शिक्षकाने वर्गातच लघुशंका केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सकाळी विद्यार्थी शाळेत आल्यानंतर हा प्रकार त्यांनी पाहिला.तसेच याची माहिती मुख्याध्यापक तसेच पालकांना माहिती दिली.यावेळी नागरिकांनी शाळेत धाव घेतली त्यानंतर शिक्षक मरसकोल्हे यांना उठवण्याचे प्रयत्न सुरू झाले परंतु ते इतके नशेत होते की, त्यांना उठता देखील येत नव्हतं. अखेर रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मरसकोल्हे यांना रुग्णवाहिकेने रूग्णालयात रवाना केले. दरम्यान शिक्षकाचा हा प्रताप अनेकांनी कॅमे-यात कैद केला आहे.

शिक्षक म्हणले की समाजाला आदर्श व्यक्तिमत्त्व घडवून देणारा चेहरा रेखाटला जातो. परंतु आदर्श घडवून देणाऱ्या याच शिक्षकाने आपल्या पेशाला काळीमा फासला आहे. काही महिन्यापूर्वी असाच एक प्रकार अमरावती जिल्ह्यातून समोर आला होता.  मेळघाटमधील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!