मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस फुटणार?
महाविकास आघाडीचे अस्तित्व संपणार?, तब्बल एवढे आमदार भाजपात प्रवेश करणार? राजकीय भुकंपाची हॅट्रिक?
सोलापुर दि ३०(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे सत्तेचा अडीच वर्षाचा कार्यकाल हुकल्यामुळे भाजप कमालीची आक्रमक झाली आहे.त्यामुळेच आधी शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाली. पण आता भाजपाचे पुढचे लक्ष्य काँग्रेस आहे. लवकरच काँग्रेसमध्ये फूट पडणार असून अनेक आमदार भाजपात प्रवेश करतील असा दावा करण्यात आला आहे.
भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोठा दावा केला आहे. तसेच काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत असा गाैप्यस्फोट देखील त्यांनी केला आहे. निंबाळकर म्हणाले की, काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जावून काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा गौप्यस्फोट खासदार निंबाळकर यांनी केला आहे. दुसरीकडे सत्ता परिवर्तनानंतर भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सुर चांगलेच जुळले आहेत. कारण राष्ट्रवादीचे खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीत दोन लाख मतांनी विजयी करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे माढा मतदारसंघाची लढत लक्षवेधी ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांच्यात अंतर पडत गेले आहे. त्यांच्यात सध्या खासदारकीच्या तिकिटासाठी तीव्र स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे २०२४ साली मोहिते आणि निंबाळकर यांच्यात जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.