कमालच! दोन पोलिसांची भर रस्त्यावर जोरदार हाणामारी
हाणामारीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल, कारण एैकून चकित व्हाल, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
पटना दि २०(प्रतिनिधी)- कायदा सुव्यवस्था राखणे समाजात शांतता ठेवणे हे पोलिसांचे काम असते. पण जर हेच पोलीस आपापसात हाणामारी करत असतील तर असे पोलीस कायदा सुव्यवस्था कशी राखणार असा प्रश्न उपस्थित होती. पण दोन पोलीस आपापसात भिडल्याची घटना बिहार मध्ये घडली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
बिहारमधील सोहसराय रेल्वे थांब्याजवळ ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये ही मारहाण झाली आहे. पैशावरुन या पोलीसांनी ही हातघाई केली आहे. रेल्वे थांब्यावर दोन पोलीसांमध्ये पैशावरून वाद सुरु होता. पण हा वाद वाढत गेला आणि दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर एका पोलिसाने गाडीतून काठी काढली आणि दुसऱ्या पोलिसाने झाडावरून काठी तोडली. यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दरम्यान, हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे उपस्थित नागरिकांनी दोन्ही पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या दोन पोलीसांनी ज्या कारणामुळे हाणामारी केली. त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलिसांच्या कृत्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करून विभागीय कारवाई करण्यात येणार आहे. असे सांगितले आहे.
बिहार पुलिस के जवान वसूली के लिए आपस में भिड़े…. वीडियो नालंदा का बताया जा रहा….
अनपढ़ राजा (@yadavtejashwi) के राज में जनता का क्या होगा? pic.twitter.com/8ZCXEN8LBZ
— Prateek Mishra (@mishr_prateek) September 18, 2023
सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. पण पोलिसच कायदे पाळत नसतील तर सामान्य जनतेने कोणाकडे पहायचे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्या या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा होत आहे.