…या कारणामुळे भाजपा आमदार ढसाढसा रडला
भाजपा प्रदेशाध्यक्षांवर केला गंभीर आरोप, कार्यकर्तेही आक्रमक, रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
भोपाळ दि २४(प्रतिनिधी)- देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. सर्वजन त्याच्या तयारीला लागले आहे. पण त्यातच पक्षाने विद्यमान आमदाराला तिकीट नाकारल्याने रडू कोसळले आहे. आमदाराचा रडतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेशमध्ये सध्या विधानसभेची निवडणुक सुरु आहे. भाजपा या ठिकाणी सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण हे करत असताना अनेकांचे तिकीट कापले जात आहे. यातूनच छतरपूर जिल्ह्यातील चंदला विधानसभेचे आमदार राजेश प्रजापती यांचं तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे प्रजापती यांच्या भावनाचा बांध फुटल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांनी ज्या नेत्याला तिकीट दिलं आहे तो गुन्हेगार असून जुगार खेळतो, चुकीचं काम करतो, असा आरोप केला आहे. त्यामुळे पक्षातील हे बेदिली देखील यानिमित्ताने समोर आली आहे. “चुकीचं काम करणाऱ्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं. अशा नेत्याच्या बाजूनं कोण उभा राहणार? सर्वेत माझं नाव होतं. तरीही तिकीट का नाकारण्यात आलं?” असे सवाल उपस्थित करतानाच राजेश प्रजापतींना माध्यमांसमोर रडू कोसळले. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तिकीट कापल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, तिकीट देण्यात आलेल्या उमेदवाराला विरोध करण्याचा निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपाला विजय मिळणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे भाजपात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे. कारण भारतीय जनता पक्षाने पाचव्या यादीत सिहोर जिल्ह्यातील आष्टा विधानसभेचे विद्यमान आमदार रघुनाथ मालवीय यांचे तिकीट रद्द करून जिल्हा पंचायत अध्यक्ष गोपाल सिंह यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजांची सध्या दिसत आहे.