Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीचा हटके उखाणा सोशल मिडीयावर व्हायरल

नवरात्रातही गरबा नृत्यावर धरला ठेका, दोन्ही व्हिडिओ सोशल मिडीयावर हीट, लुकचीही चर्चा

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपली राजकीय वक्तव्ये, गायन आणि माॅडर्न लुक यामुळे त्यांची नेहमीच चर्चा होत असते. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. याला कारण ठरले आहे ते म्हणजे त्यांनी आपले पती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी घेतलेला उखाना आणि गरब्यात केलेला हटके डान्स. सध्या त्यांच्या या दोन घटनांची जोरदार चर्चा होत आहेत.

आज दसरा पार पडत असला तरीही अगोदर नवरात्र पार पडले यावेळी अनेक ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूरमध्येही अशाच एका गरबा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते; ज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. तिथे अमृता फडणवीस यांनाही गरबा खेळण्याचा आनंद लुटला. त्यांच्या गरबा नृत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. झुंजार नागरिक मंचातर्फे आयोजित रास गरबा उत्सवात त्यांनी हा गरबा खेळाचा आनंद लुटला. या कार्यक्रमात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास उखाणाही घेतला आहे. त्यांनी घेतलेल्या उखाण्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. “मी फिरते मळ्यात, नजर माझी तळ्यात… देवेंद्रजी सारखे रत्न पडले माझ्या गळ्यात…” असा उखाणा अमृता फडणवीसांनी घेतला आहे. त्यांच्या या उखाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. अमृता फडणवीस यांच्या नृत्य आणि उखाण्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम राहो, सर्व क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येवो. आपल्या नागपुरात असुविधा न येवो, अशी प्रार्थना करते.” असे साकडे त्यांनी देवीकडे घातले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडवणीस या त्यांच्या गाण्यांमुळे चर्चेत असतात. तसेच अमृता फडणवीस या सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असतात. मध्यंतरी त्यांनी अमेरिकेतही आपल्या गाण्याची जादू दाखवली होती. त्याची देखील चर्चा झाली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!