Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यातील तरुणीच्या खुनाचा व्हिडिओ व्हायरल

शुभदाने केलेली कृष्णाची फसवणूक, कराडमध्ये सत्य समजल्यानंतर कृष्णाचा संताप आणि...

पुणे – पुण्यातील येरवडा भागात कंपनीतल्या सहकाऱ्यानेच तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. येरवडात कंपनीत पार्किंगमध्ये दोघांमध्ये पैशावरून वाद झाले, या वादानंतर तरुणीच्या सहकाऱ्याने तिच्यावर कोयत्याने वार केले, या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. आता या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

शुभदा कोदारे या तरुणीचा तिच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कृष्णा कनोजा नावाच्या आरोपीने आर्थिक वादातून खून केला होता. शुभदा आणि आरोपी कृष्णा हे दोघंही कंपनीत अकाऊंटट म्हणून काम करत होते. शुभदाने वडील आजरी आहेत त्यांच्यावर शस्त्रक्रिया करायची आहे हे सांगून तिने कृष्णा कडून कधी २५ हजार तर कधी ५० हजार असे एकूण ४ लाख रुपये घेतले होते. पण ती कृष्णाकडे आणखी पैशाची मागणी करत होती. त्यामुळे कृष्णाने शुभदाचे मुळ गाव कराडला गेला. तेंव्हा त्याने पाहिले की, शुभदाचे वडील अगदी ठणठणीत होते. तसेच त्यांचे कोणते आॅपरेशन देखील होणार नव्हते. कृष्णाने तिला अद्दल घडवायचे ठरवले, आणि हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू झाला. आता या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शुभदावर आरोपी कृष्णा पार्किगमध्ये कोयत्याने वार करताना दिसत आहे. पार्किंगमध्ये शुभदाच्या हत्येचा थरार सुरू होता तेव्हा सर्वजण गर्दी करून बघत होते. आरोपीच्या हातामध्ये कोयता असल्यामुळे घाबरून कोणी मदतीसाठी धावला नाही. पण त्याने कोयता खाली टाकताच नागरिकांनी त्याला पकडून चोप दिला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये या हत्याकांडाचा व्हिडीओ शूट केला होता. जो सध्या व्हायरल होत आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कृष्णा सत्यनारायण कनोजिया याला अटक केली आहे. येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!